Header Ads

अधिक महिन्यामुळे सोन्या-चांदीच्या दुकानात गर्दी

 अधिक महिन्यामुळे सोन्या-चांदीच्या दुकानात गर्दी...

---------------------------

माधुरी मस्कर- पन्हाळा 

-----------------------------

 रविवार  पासून अधिक महिन्यास प्रारंभ होत आहे. या महिन्यात नवदापत्यांना अधिक महिना म्हणून दागिने भेट दिली जात असते. हिंदू समाजामध्ये ही परंपरा असल्याने विशेष चांदीची भेट दिली जाते. या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसापासून चांदीच्या दरा वाढ झाली आहे अधिक महिना सुरू होत असल्याने पुढील महिन्यापर्यंत चांदी पाठोपाठ आता सोन्याच्या दरातही वाढ होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे..


दर तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो या महिन्यात नवदापत्यांना भेट देण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे. यामुळे चांदीच्या वस्तू ,सोन्याचा दागिना,पेरावा करण्याची पद्धत आहे. यंदा रविवार 17 तारखेपासून अधिक महिना सुरू होत असून पुढील एक महिन्यापर्यंत भेट वस्तूचा वर्षाव सुरू राहणार आहे. अधिक महिना सुरू होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस राहिले असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये जोडवी, गणपती, अन्नपूर्णा अशा वस्तू घेण्यासाठी गर्दी दिसू लागली आहे. नुकत्याच झालेल्या युद्धामुळे सोने व चांदी दरावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आता सोने अथवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा चांदीमध्ये गुंतवणूक केले जात असल्याचे दिसून येत आहे. जरी सोन्या-चांदीचे दर वाढले असले तरी नवदापत्यांना अधिक महिना हा खरेदीचा व आनंदाचा जाणार आहे..

No comments:

Powered by Blogger.