इस्पुर्लीत पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासन झोपेत का?
इस्पुर्लीत पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासन झोपेत का?
पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, तरीही दुचाकींमधून पेट्रोल चोरीच्या घटना सुरूच
--------------------------युवराज पोवार.
--------------------------
करवीर इस्पुर्ली गावात पेट्रोल चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, बाहेर पार्किंग केलेल्या दुचाकींमधून रात्रीच्या वेळी सर्रास पेट्रोल चोरी होत आहे. मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
गावात पोलीस स्टेशन असतानाही चोरटे बिनधास्तपणे आपले हात साफ करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वाहनधारकांच्या दुचाकींमधून वारंवार पेट्रोल चोरी होत असून, तरीदेखील पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा गावात रंगली आहे.
“सामान्य नागरिकांनी नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. रात्री गस्त वाढविणे, संशयितांवर लक्ष ठेवणे किंवा चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असताना पोलीस यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
पेट्रोल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आता तरी पोलीस प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न इस्पुर्लीकर विचारत आहेत.

No comments: