Header Ads

कोल्हापुरात गुंडांची दहशत! युवकाला बेदम मारहाण करून दुचाकीसह मोबाईल लुटला; दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

 कोल्हापुरात गुंडांची दहशत! युवकाला बेदम मारहाण करून दुचाकीसह मोबाईल लुटला; दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


--------=-----------------------
कोल्हापूर प्रतिनिधी.
 शशिकांत कुंभार.
-------------------====

शहरातील बापट कॅम्प परिसरात चार जणांच्या टोळीने एका युवकावर थरारक हल्ला करून त्याला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोखंडी रॉड आणि विटेने डोक्यात वार करत आरोपींनी युवकाची दुचाकी, मोबाईल आणि रोकड हिसकावून नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक करत गुन्ह्याची उकल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार संजय शिंदे (वय २५, रा. केर्ली, ता. करवीर) हा मित्रासह कामानिमित्त बापट कॅम्प परिसरात आला होता. यावेळी आरोपींनी त्याला अडवत शिवीगाळ केली आणि अचानक लोखंडी रॉड व विटेने हल्ला चढवला. मारहाणीत युवक जखमी झाल्यानंतर आरोपींनी त्याच्या खिशातील पाच हजारांची रोकड, विवो कंपनीचा मोबाईल आणि यामाहा मोटारसायकल घेऊन पलायन केले.

घटनेनंतर शाहुपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे पियुश शंकर पवार आणि किरण धोंडीराम वराळे या आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम व मोबाईल जप्त केला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. न्यायालयाने आरोपींना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव व त्यांच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.