ST आरक्षणासाठी गोर सेनाचा एल्गार : 7 मे ला राज्यभर 300 ठिकाणी निवेदन देण्यात येणार. प्रा.संदेश चव्हाण
ST आरक्षणासाठी गोर सेनाचा एल्गार : 7 मे ला राज्यभर 300 ठिकाणी निवेदन देण्यात येणार. प्रा.संदेश चव्हाण
--------------------------------पुसद : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाने 3 महिन्यांपूर्वी अभ्यास समिती नेमली. परंतु समिती स्थापन होऊन 3 महिने उलटूनही समितीचे कामकाज ठप्प आहे. शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी *गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदेशभाऊ चव्हाण* यांच्या नेतृत्वाखाली, आदेशाने *दिनांक 07 मे 2026, गुरुवार रोजी* संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी 300 ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात येणार आहे.
पुसद तालुक्यात गोरसेनेच्या वतीने *गुरुवार, दि. 7 मे 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता* कार्यकर्ते *स्व. वसंतराव नाईक चौक* येथे एकत्र जमणार आहेत. तेथून शांततेने, शिस्तीत मोर्चाने जाऊन तहसीलदार, पुसद यांना निवेदन देण्यात येणार आहे 3 महिन्यांपूर्वी राज्यभर 54 विराट मोर्चे काढून सरकारला जागे केले. सरकारने समिती नेमली, पण ती फक्त कागदावरच राहिली. समितीने अद्याप एकही बैठक घेतली नाही. हा बंजारा समाजाच्या भावनांशी खेळ आहे. म्हणून 7 मे ला राज्यभर एकच आवाज घुमणार - *'ST आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे'*. हा लढा शांततामय मार्गाने, लोकशाहीच्या चौकटीत राहून लढला जाईल," असे गोरसेना अध्यक्षांनी सांगितले.ST आरक्षण अभ्यास समितीने तातडीने काम सुरू करून 30 दिवसांत अहवाल सादर करावा व बंजारा समाजाला ST च्या सवलती लागू कराव्यात.
तालुक्यातील सर्व बंजारा बांधव, गोरसेना कार्यकर्ते व ST आरक्षण समर्थकांनी 7 मे रोजी सकाळी 11 वाजता स्व. वसंतराव नाईक चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

No comments: