Header Ads

कॅफेंमधील संशयास्पद प्रकारांवर धाड; वापरलेले कंडोम, गोळ्यांची पाकिटे आढळल्याचा दावा.

 कॅफेंमधील संशयास्पद प्रकारांवर धाड; वापरलेले कंडोम, गोळ्यांची पाकिटे आढळल्याचा दावा.

---------------------------
सागली मिरज. प्रतिनिधी.
राजू कदम.
---------------------------


सांगली, प्रतिनिधी : शहरातील काही कॅफेंमध्ये संशयास्पद प्रकार सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत काही कॅफेंवर धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान काही कॅफे परिसरात तसेच आतील भागात वापरलेले कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या (अनवाँटेड पिल्स) रिकाम्या पाकिटांसारख्या वस्तू आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

विश्रामबाग परिसर आणि रीसाला रोडवरील काही कॅफेंची तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. संबंधित ठिकाणी आढळलेल्या वस्तूंची सत्यता आणि त्यामागील कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या कारवाईवेळी सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी पोलीसांकडून पुढील चौकशी सुरू असून संबंधित कॅफे चालकांकडून माहिती घेतली जात आहे. तपासानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण वास्तव स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

No comments:

Powered by Blogger.