Header Ads

निर्मिती पब्लिक स्कूल येथे श्री संत गजानन महाराज सामूहिक पारायण सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद....

 निर्मिती पब्लिक स्कूल येथे श्री संत गजानन महाराज सामूहिक पारायण सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद

अमरावती जिल्ह्यातील ३,५२६ माऊली भक्तांनी घेतला पारायणाचा लाभ; मुळगाव येथील श्रींच्या पादुकांचे भाविकांना दर्शन.

------------------------------
 चांदूरबाजार प्रतिनिधी 
मयूर कापरे.
------------------------------

चांदूर बाजार प्रतिनिधी : पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामूहिक पारायण सोहळ्यास अमरावती जिल्हाभरातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. चांदूर बाजार येथील निर्मिती पब्लिक स्कूल, नानोरी रोड येथे संपन्न झालेल्या या भव्य धार्मिक सोहळ्यात तब्बल ३,५२६ माऊली भक्तांनी सामूहिक पारायणाचा लाभ घेतला.पहाटे ६ वाजता सुरू झालेल्या या पारायण सोहळ्यास चांदूर बाजार तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील विविध भागांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. डोमक, सोनोरी, नानोरी, शिरजगाव बंड, शिरजगाव अर्डक, देऊरवाडा, विश्रोरा, शिराळा, वणी, घाटलाडकी आदी गावांतील संत गजानन महाराज सेवेकरी, महिला मंडळे, भजन मंडळे व माऊली भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच अचलपूर, मोर्शी, अमरावती आणि परिसरातील अनेक गावांमधूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे शेगाव मुळगाव येथून श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र चरणपादुकांचे आगमन दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आले  श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. भक्तिभावाने आणि जयघोषांच्या वातावरणात पादुकांचे स्वागत करण्यात आले. पादुकांचे दर्शन घेताना अनेक भाविक भावविवश झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. पारायण, भजन, नामस्मरण आणि सेवाकार्य यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले. विशेष म्हणजे या ठिकाणी सेवेकऱ्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेली निस्वार्थ सेवा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छता व्यवस्था आणि भाविकांच्या सुविधांची उत्तम व्यवस्था यामुळे सोहळ्याची भव्यता अधिकच खुलून दिसली.

सोहळ्यानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाआरती  व  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत धार्मिक आनंद अनुभवला.

हा भव्य धार्मिक सोहळा गो सी टोम्पे  संस्थेचे अध्यक्ष भास्करराव टोम्पे, विजयराव टोम्पे तसेच परिसरातील गो सी टोम्पे कॉलेज,  संत गजानन महाराज सेवेकरी, महिला मंडळी भक्त परिवार, भक्तांना येणे जाणे निस्वार्थी सेवा करिता तालुका स्कूल बस्स संघटना  आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला. अमरावती जिल्ह्यातील भक्तांच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि सेवाभावाचे दर्शन घडविणारा हा सोहळा भाविकांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला.

No comments:

Powered by Blogger.