Header Ads

पुसद येथे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने 'जागतिक पर्यावरण दिन साजरा......

 पुसद येथे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने 'जागतिक पर्यावरण दिन साजरा....

--------------------------
सिद्धार्थ कदम 
पुसद तालुका प्रतिनिधी.
---------------------------

आज दिनांक 5 जुन रोजी पुसद मधील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी पुसद शहरामध्ये जनतेमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात जनजागृती व्हावी. सध्या पर्यावरण संतुलन हे बिघडत आहे त्यावर उपाय योजना करण्याकरिता सायकल व ई बाईकच्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला सकाळी 6.30 वाजता माननीय उपविभागीय अधिकारी पुसद श्री आशिषजी बिजवल साहेब यांचे स्वागत माणुसकीची भिंत चे अध्यक्ष श्री गजानन जाधव पंकज पाल महाराज, मिशन ग्रीन बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश डंबोळे, वसुंधरा बहुद्देशीय संस्था अध्यक्ष श्री अमोल गंगात्रे, ज्ञानदीप अकॅडमीचे श्री कौस्तुभ धुमाळे, नाम फॉउंडेशनचे अध्यक्ष श्री स्वप्नील देशमुख, डॉ. असोशियन चे डॉ. श्री अग्रवाल, वंदे मातरम सायकल ग्रुपचे श्री अजय क्षीरसागर सर रुग्ण मित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले व या प्रसंगी सर्व उपस्थित सर्व निसर्गप्रेमीच्या हस्ते उपविभागीय अधिकारी श्री आशिषजी बिज्वल साहेब यांचा एक वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माननीय श्री बिजबल साहेब यांनी सरकार मार्फत चळविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणार आधारित सरकारी योजनाची माहिती दिली. व पाणी साठविण्याच्या बाबतीत पुसद तालुका अत्यंत मागे असल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनानंतर नंतर या प्रभात फेरीला सुरवात झाली. ही प्रभात फेरीची सुरवात गीताई केंद्र येथून होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,नेताजी सुभाषचंद्र चौक, कापड लाईन, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे स्व. वसंतराव नाईक चौक येथे आली. या ठिकाणी मा डॉ.संजय अग्रवाल यांनी प्लास्टिक वापर हा आपल्या शरीराला किती घातक आहे. व त्या वापराचे किती भयंकर परिणाम आपल्या शरीरावर होतात याची माहिती दिली.

या नंतर ही प्रभात फेरी माणुसकीची भिंत शनी मंदिराजवळ आली. या प्रसंगी सप्तखंजिरी वादक आदरणीय श्री पंकजपाल महाराज यांनी अत्यंत खेळी मेळीच्या शैलीमध्ये पर्यावरणाचे महत्व लोकांना पटवून दिले. आम्हांला मंदिर हवे आहेत, देव सुद्धा आवश्यक आहेत त्यावर वाहण्याकरिता बेलाचे झाड सुद्धा लावले पाहिजे असेही  त्यांनी या प्रसंगी सांगितले. समारोपीय भाषण मोक्ष धाम पुसद चे अध्यक्ष तसेच पुसद गार्डन क्लब चे अध्यक्ष आदरणीय श्री दिपक भाऊ आसेगावकर यांनी केले. त्यांनी या प्रसंगी पुसद मोक्ष धाम येथे पर्यावरण पुरक होत असलेल्या दहनाची सविस्तर माहिती दिली. तसेच या माध्यमातून पुढील वर्षी पुस नदी स्वछता मोहीम सुरु करण्याकरिता सर्व सामाजिक संघटनानी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.पुसद येथील मिशन ग्रीनच्या कार्याची दखल घेऊन व या कार्यकारिता मदत म्हणून निसर्ग संवादचे,आदरणीय श्री गजानन वायकुळे सर व राजीव कांडलकर सर यांनी मिशन ग्रीनला अकरा हजाराचा चेक दिला. या फेरीच्या समारोपच्या ठिकाणी फराळाची व्यवस्था माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशन तर्फे करण्यात आली होती.

या प्रभात फेरी मध्ये मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था पुसद,माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशन पुसद,

वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद,रुग्णमित्र फॉउंडेशन पुसद, ज्ञानदीप अकॅडमी पुसद,नाम फॉउंडेशन पुसद 

रोटरी क्लब ऑफ पुसद,

लॉयन्स क्लब पुसद,डॉक्टर असोसिएशन पुसद, 

 वंदे मातरम सायकल ग्रुप पुसद,पतंजली योग समिती, निसर्ग संवाद,

पुस सेवा फॉउंडेशन पुसद, गीताई केंद्र पुसद इत्यादी संघटनानी सक्रिय सहभाग घेतला होता...

No comments:

Powered by Blogger.