Header Ads

मंडलिक कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न.

 मंडलिक कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न.

-----------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार.
-----------------------------

लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालूका सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 5 जुन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारखान्याचे संचालक  विश्वासराव कुराडे व  तुकाराम ढोले यांचे हस्ते पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी कारखाना व कारखाना परिसरातील विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. 

यावेळी पर्यावरणाचे महत्व सांगताना सेफ्टी ऑफिसर नितीन दरेकर यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष संवर्धन महत्वाचे असून वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणेसाठी प्रत्येकांनी वृक्षारोपण करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच कारखान्यातील पर्यावरण पुरक उपक्रम सातत्याने राबविले जात असून भविष्यातही हरित विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. 

यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर (प्लॅंट) संजॉय संकपाळ, चिफ केमिस्ट विक्रम पाटील, शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी, प्र.सेक्रेटरी सुदाम देसाई, ऊस विकास अधिकारी श्री सुशांत जाधव, लेबर ऑफिसर श्री शांतिनाथ मगदूम तसेच सर्व अॅग्री ओव्हरसियर व कामगार  कर्मचारी उपस्थित होते. 

झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा हा संदेश देवून कार्यक्रमाची सांगता करणेत आली.

No comments:

Powered by Blogger.