Header Ads

करवीर पोलिसांचा दणका! अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई; १३.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त, वाईन शॉप मालकही अडचणीत!

करवीर पोलिसांचा दणका! अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई; १३.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त, वाईन शॉप मालकही अडचणीत! 

-----------------

कोल्हापूर प्रतिनिधी.

 शशिकांत कुंभार.

-----------------

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात करवीर पोलिसांनी जोरदार धडक कारवाई करत दोन दारूतस्करांना जेरबंद केले असून तब्बल १३ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शोध पथकातील विजय पाटील, सोमराज पाटील, सुभाष सरवडेकर, नाथा गळवे, रणजीत पाटील, विजय तळसकर, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण आणि श्रीधर जाधव यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन ठिकाणी सापळा रचून विदेशी व देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापे टाकले.

या कारवाईत ४ लाख ५९ हजार ५७५ रुपयांची देशी-विदेशी दारू, एक टेंपो आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात ही दारू कोल्हापूरातील गोल्डन वाईन्स व मेरवाडे वाईन्स येथून घेतल्याचे निष्पन्न झाले असून संबंधित वाईन शॉप मालकांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्या परवान्याच्या रद्द प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे.

या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाला मोठा हादरा बसला असून पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.