Header Ads

तारळेतील न्यू हायस्कूलच्या शिक्षक विद्यार्थ्यांसह महिलांनी घेतली भोगावती नदीमध्ये पाणी बचतीची शपथ.

तारळेतील न्यू हायस्कूलच्या शिक्षक विद्यार्थ्यांसह महिलांनी घेतली भोगावती नदीमध्ये  पाणी बचतीची शपथ

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित यशस्वीपणे राबविले गेले जलसंवर्धन अभियान.



कसबा तारळे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित येथील न्यू हायस्कूलच्या वतीने अभिनव पद्धतीने जलसंवर्धन जनजागृती अभियान राबविण्यात आले.यावेळी शाळेचे शिक्षक ,कर्मचारी, विद्यार्थ्यांसह महिलांही पवित्र भोगावती नदीमध्ये उतरून पाणी बचत करण्याची प्रतिज्ञा घेतली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाणी बचत संदेश पत्रिकेचे अनावरण करण्यात आले.अशा संदेशांमधून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.हे अभियान यशस्वीपणे राबविले गेल्याने ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

   दरम्यान,यावेळी भोगावती नदीच्या पवित्र तीरावर जलपूजनाचा प्रेरणादायी व अभिनव असा उपक्रम राबविण्यात आला.शालेय मुलींनी पाण्याचे विधिवत पूजन करून जलस्रोतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच उपस्थित महिलांनी पालखीचे,छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि कलशाचे पूजन करून जलसंवर्धनाचा संदेश दिला.

  प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक एस.आर.जमाल यांनी केले.त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक ए. एस. पाटील व पालक साहेबजी बामणेकर यांनी केले.त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारणारा अनिश उमेश पाटील, शाळेचा नूतन विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत सुतार, विद्यार्थिनी प्रतिनिधी अमृता पाटील,सलीम गोरे यांचा मुख्याध्यापक एम.डी.मांगोरे यांच्या हस्ते सत्कार झाला.यावेळी मुला मुलींनी शाहूंच्या  लोककल्याणकारी कार्याचे स्मरण भाषणातून केले.

     त्यानंतर गावातून जलदिंडी काढण्यात आली.त्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारणारा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी अनिश उमेश पाटील हा सर्वांच्या नजरेत भरला.यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी अडवा..पाणी जिरवा,पाणी वाचवा..भविष्य घडवा ,आजची बचत..उद्याचे भविष्य या दिलेल्या घोषणांनी सारा परिसर वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक थेंबाचे महत्त्व अधोरेखित करून गेला.या जलदिंडीचे ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केले. विशेषतः गल्लोगल्ली महिलांनी पालखीचे पूजन करून औक्षण केले.जलदिंडी भोगावती नदीच्या घाटावर पोहोचताच नदीला कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी धुणे तिथेच टाकून या अभियानात सहभागी झाल्या.

    यावेळी जलसंवर्धन अभियानांतर्गत 

सरपंच सौ.विमल पाटील,उपसरपंच हकीम बलवंड ,जिल्हा बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, प्रकाश पाटील,युवा शक्तीचे अध्यक्ष शेखर पाटील,

एम.डी.पाटील,बळवंत किरुळकर,हसन नाईक,याकूब बक्षू,संदीप पाटील, शिवाजी अनंत पाटील,निवास बावडेकर, नितीन पाटील,शिवाजी कांबळे, डॉ.सुनील ऱ्हायकर,शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत पाटील यांच्या हस्ते गावातील नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणाऱ्या संदेशपत्रिकांचे वाटप करण्यात आले. 

जलसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

  या अभियानामध्ये मुख्याध्यापक एम. डी. मांगोरे, एस.आर.जमाल ,एस.बी.पोवार, पी.एन. पवार, जी.एम.मोहिते,एस.एस. आरडे,कु. ए.पी.पाटील, कु.पी.आर.भोगटे,

एन.डी.पाटील, एस.आर.गोरे, ओमकार कांबळे,सुरेश डवरी, विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत सुतार, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.अमृता पाटील यासह ग्रामस्थही सहभागी झाले होते.

  एकूणच राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि जलसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला गेला.या स्तुत्य उपक्रमाची चर्चा परिसरातही जोर धरू लागली आहे.

चौकट 

जलसाक्षरतेची भावना अधिक दृढ झाली !

      राजर्षी शाहू महाराजांनी समाजहितासाठी दिलेल्या जलनीतीची प्रेरणा घेत पर्यावरण संरक्षण व जलसंवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.असे मत मान्यवरांनी व्यक्त करून शाळेने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. 

  या प्रयोगशील व अभिनव अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थामध्येही जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. घरोघरी वाटलेल्या संदेश पत्रिकेमुळे जलसाक्षरतेची भावना अधिक दृढ झाली.

फोटो कॅप्सन 

कसबा तारळे:येथील न्यू हायस्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या जलसंवर्धन अभियानाअंतर्गत पाणी बचतीची शपथ घेताना शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ.तर दुसऱ्या छायाचित्रात पाणी बचत संदेश पत्रिकेचे अनावरण करताना सरपंच विमल पाटील,शिवाजीराव पाटील,पी, डी,पाटील,हकीम बलवंड,मारुती पाटील व इतर.

No comments:

Powered by Blogger.