राधानगरी धरण 57 टक्के भरले; पावसाचा जोर ओसरला, तरी पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ.
राधानगरी धरण 57 टक्के भरले; पावसाचा जोर ओसरला, तरी पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~राधानगरी धरण परिसरात बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या ताज्या माहितीनुसार, राधानगरी धरण सध्या 57 टक्के भरले असून पाण्याची आवक कायम आहे.
आज सकाळी ७ ते सायंकाळी ४ या कालावधीत धरण परिसरात 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या धरणाची पाणीपातळी 324.79 मीटर असून धरणात 4,754.89 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आजपर्यंत एकूण 1,420 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून त्यामुळे धरणातील जलसाठा सातत्याने वाढत आहे.
दरम्यान, काळम्मावाडी धरण 25 टक्के, तर तुळशी धरण 54 टक्के भरले आहे. धरण परिसरातील नाले व ओढ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने भोगावती नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी धरण क्षेत्रात पाण्याची आवक सुरूच असून पाटबंधारे विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अद्याप कोणताही सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला नाही.

No comments: