Header Ads

सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या; सागर बेग व आकाश बेग यांना पोलीस संरक्षणाची सकल हिंदू समाजाची मागणी.

 सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या; सागर बेग व आकाश बेग यांना पोलीस संरक्षणाची सकल हिंदू समाजाची मागणी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोहित  पास्ते.मलकापुर प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मलकापूर :- राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग व शिवसेनेचे नगरसेवक आकाश बेग यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भातील निवेदन शाहुवाडी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले. तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनात सागर बेग आणि आकाश बेग यांचे तातडीने धोका मूल्यांकन (Threat Assessment) करून त्यानुसार आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते रुपेश वारंगे, चेतन भुर्के यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.