मुरगूड शहरात सिंगल यूज प्लास्टिकविरोधी विशेष तपासणी मोहीम ५० किलो प्लास्टिक जप्त,
मुरगूड शहरात सिंगल यूज प्लास्टिकविरोधी विशेष तपासणी मोहीम ५० किलो प्लास्टिक जप्त, ५ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई.
~~~~~~~~~~~~~~~~~~~मुरगूड नगर परिषद, मुरगूड यांच्या वतीने नगराध्यक्ष, मुरगूड नगर परिषद तसेच मुख्याधिकारी, मुरगूड नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने मुरगूड शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहिमेदरम्यान किराणा दुकाने, बाजार, हॉटेल खानावळी नाष्टा सेंटर, बस स्थानक तेथील दुकाने, चिकन मटण विक्री दुकाने, फिरते स्थिर फेरीवाले भाजी विक्रेते व फुले विक्रेते व्यावसायिक आस्थापने अशी एकूण ३० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने सुमारे ५० किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रु.१,६००/- इतका दंड वसूल करण्यात आला. यापुढील काळातही अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, साठा किंवा विक्री करताना आढळणाऱ्या व्यक्ती, व्यापारी व आस्थापनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन मुख्याधिकारी अतिश वाळूंज यांनी दिला आहे.
यावेळी उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, स्वच्छता निरीक्षक सागर येवारे, शहर समन्वयक अथर्व वर्मा, कनिष्ठ लीकीप कुणाल भारती, मुकादम भिकाजी कांबळे आदि अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

No comments: