Header Ads

आळेफाटा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताची शक्यता... अहिल्यानगर-कल्याण महामार्गाची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

 आळेफाटा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताची शक्यता... अहिल्यानगर-कल्याण महामार्गाची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 आळेफाटा प्रतिनिधी कैलास बोडके
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आळेफाटा :- अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटा (ता. जुन्नर )चौकातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून डांबर उखडले आहे. त्यामुळे दुचाकीधारक आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे न दिसल्याने अपघात होण्याची भीती आहे.

आळेफाटा हे जुन्नर, नारायणगाव, अहिल्यानगर आणि कल्याणकडे जाणाऱ्या वाहतुकीचे महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून रोज हजारो ट्रक,कार,एसटी आणि प्रवासी वाहने जातात. मात्र खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय होत आहे.

 "महिन्यातून दोनदा टायर बदलावा लागतोय. संबंधित प्रशासनाला तक्रार करूनही कोणी फिरकत नाही," अशी प्रतिक्रिया येथील व्यावसायिकांनी दिली. प्रशासनाने तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.