Header Ads

गुरूंच्या चरणी कृतज्ञतेचा भाव; विद्या मंदिर सावर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

गुरूंच्या चरणी कृतज्ञतेचा भाव; विद्या मंदिर सावर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शाहुवाडी प्रतिनिधी -आनंदा तेलवणकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शाहुवाडी :विद्या मंदिर सावर्डी येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे, कविता, गीत आणि मनोगते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू अर्पण करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त आणि मूल्याधिष्ठित जीवनाचे महत्त्व सांगत गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनीही गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत हा दिवस संस्मरणीय बनविला.

कार्यक्रमास मुख्याध्यापक आनंदा काशीद, पूजा गुरव, संगीता खरोडे, अश्विनी सावंत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.