Header Ads

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शाहूपुरी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शाहूपुरी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.


कोल्हापूर:शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत १८ वर्षीय नराधम आरोपीला अटक केली आहे. *नदीम सादिक परांडे* (वय १८ वर्षे १० महिने, रा. माऊली पुतळा चौक, राजारामपुरी, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी नदीम परांडे याने २१ जून २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास तिला आपल्या मोटरसायकलवरून नेले. शाहूपुरी येथील जनता बाजार परिसरातील माणिक चेंबर्सच्या तळमजल्यावर असलेल्या 'द पिझ्झा स्लाइस कॅफे'मध्ये तो तिला घेऊन गेला. तिथे त्याने मुलीशी जवळीक साधून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

या कृत्यानंतर आरोपीने पीडितेला "याबाबत कोणाला किंवा घरी काही सांगितले, तर तुला आणि तुझ्या घरच्यांना सोडणार नाही," अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर धाडस करून आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रसंग सांगितला.

त्यानंतर २८ जुलै २०२६ रोजी रात्री २१:३० वाजता या घटनेबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी *नदीम परांडे* याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६५(१), ३५१(२) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो - POCSO) २०१२ च्या कलम ४(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सिमा शेळके करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.