विद्या मंदिर साके विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उषा भोसले; उपाध्यक्षपदी प्रकाश चौगले यांची निवड
विद्या मंदिर साके विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उषा भोसले; उपाध्यक्षपदी प्रकाश चौगले यांची निवड.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कागल | प्रतिनिधी. मारुती मालवेकर.
~~~~~~~±±~~~~~~~~~~~~~~~~~~~
कागल तालुक्यातील विद्यामंदिर साके या शाळेच्या सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकत्याच झालेल्या पालक सभेत उत्साहात पार पडली. त्यानंतर झालेल्या समितीच्या बैठकीत सौ. उषा महाजी भोसले यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून विजय संपादन केला, तर श्री. प्रकाश शिवाजी चौगले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाराम डोंगळे होते. कार्यक्रमाचे स्वागत श्री. रमेश जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. बी. जी. कांबळे यांनी केले.
यावेळी समिती सदस्य श्री. भैरू पाटील, श्री. सुभाष पाटील, श्री. मयूर गिरी, श्री. नवनाथ पाटील, सौ. नीता ससे, सौ. शितल निऊंगरे, सौ. रुपाली पोवार, सौ. चित्रा सातुसे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. उषा महाजी भोसले यांनी सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच श्री. प्रकाश शिवाजी चौगले यांच्या उपाध्यक्षपदी निवडीचेही स्वागत करण्यात आले. नव्या पदाधिकाऱ्यांवर शाळेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
अभिनंदन संदेश
विद्यामंदिर साके शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. उषाताई महाजी भोसले यांनी सर्वाधिक मते मिळवून विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी मंगलमय शुभेच्छा! 🌹💐

No comments: