Header Ads

२४ तासांत चोरीचा पर्दाफाश!सांडपाणी योजनेचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड; ₹६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

 २४ तासांत चोरीचा पर्दाफाश!सांडपाणी योजनेचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड; ₹६५ हजारांचा मुद्देमाल जप्त.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सांगली | प्रतिनिधी. राजू कदम.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याने जुनी धामणी येथील शासकीय सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पावरील साहित्य चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत चोरीस गेलेला पाण्याचा पंप, फोल्डिंग पाईप, लोखंडी सळईचे बंडल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ₹६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अक्षय अनिल कोळी (वय ३०) व अनिल मारुती कोळी (वय ४३, दोघे रा. जुनी धामणी, ता. मिरज) यांना ताब्यात घेण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे अंकली येथून दोघांना पकडण्यात आले असून चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ. अभिजीत पाटील करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.