Header Ads

कोल्हापूरमध्ये वाहतुकीत मोठे बदल; रंकाळा व अंबाबाई मंदिर परिसरासाठी नवे कायमस्वरूपी नियम लागू

 कोल्हापूरमध्ये वाहतुकीत मोठे बदल; रंकाळा व अंबाबाई मंदिर परिसरासाठी नवे कायमस्वरूपी नियम लागू

कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने रंकाळा तलाव आणि अंबाबाई मंदिर परिसरात नवीन कायमस्वरूपी वाहतूक नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार अनेक मार्गांवर 'नो पार्किंग', एकेरी वाहतूक, ठराविक वेळेत वाहन प्रवेशबंदी तसेच जड वाहनांसाठी डायव्हर्शन करण्यात आले आहे.

रंकाळा परिसरात संध्याकाळी गर्दीच्या वेळेत काही मार्गांवर चारचाकी, जड वाहने व एसटी बसांना प्रवेशबंदी राहणार असून, अंबाबाई मंदिर परिसरात सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत अनेक प्रमुख रस्ते सर्वसामान्य वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी अधिकृत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, नव्या नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.