"अप्पर तहसीलदार कार्यालय, सांगली येथे घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर"
"अप्पर तहसीलदार कार्यालय, सांगली येथे घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~सांगली : जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांपैकी एक असलेल्या अप्पर तहसीलदार कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कार्यालयाच्या परिसरात साचलेला कचरा, अस्वच्छ जागा आणि स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दररोज विविध कामांसाठी शेकडो नागरिक या कार्यालयात येत असतात. मात्र, कार्यालय परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने दुर्गंधी, माशा व डासांचा त्रास वाढत असल्याची तक्रार काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासकीय कार्यालयानेच स्वच्छतेचे आदर्श उदाहरण घालून द्यावे, अशी अपेक्षा असताना येथे मात्र विपरीत परिस्थिती दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संबंधित विभागाने तातडीने कार्यालय परिसराची स्वच्छता करून नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, तसेच नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

No comments: