Header Ads

आषाढी दिंडी सोहळ्यानिमित्त कळे नगरीत विठू नामाचा गजर!

आषाढी दिंडी सोहळ्यानिमित्त कळे नगरीत विठू नामाचा गजर! 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कळे प्रतिनिधी-साईश मोळे.
~~~~~~~~~~~~~~~~~~

कळे:- श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ पणूत्रे संचलित, आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालय, कळे येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शालेय दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. टाळ-मृदंगाच्या निनादात, अभंग-भजनांच्या सुरेल गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "पांडुरंग हरी विठ्ठल" या नामघोषांनी संपूर्ण कळे नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली.

या दिंडी सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे प्रतिनिधी मा. श्री. विठ्ठल शंकर पाटील व सौ. अश्विनी राहुल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विविध भजनी मंडळांचे सदस्य, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. नामदेव आप्पा नांदवडेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. संजय आनंदा चौगले, सौ. वैशाली अमरसिंह संघर्षी, श्री. विलास दिनकर पाटील, श्री. संभाजी विष्णू बोंद्रे, श्री. रमेश बन्सी दराडे,  प्रज्ञा सागर निकम, सौ. स्वाती रणजीत पाटील उपस्थित  होते.

सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषा परिधान करून संतांच्या अभंगांचे सादरीकरण केले. शिस्तबद्ध दिंडी, भक्तिमय वातावरण आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार, भक्तीभाव, सामाजिक ऐक्य आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:

Powered by Blogger.