ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम मध्ये आषाढी वारीचा निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन संपन्न.
ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम मध्ये आषाढी वारीचा निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन संपन्न.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~25 जुलै आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आषाढी वारी निमित्त पालखी दिंडी सोहळ्याचे उत्साह पूर्ण आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास कार्यक्रमाध्यक्ष संस्थेचे मार्गदर्शक श्री केशवराव दादा ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी श्री बाबासाहेबलंगोटे,श्री.श्रीधर राव मोहोड,श्री.सतीशराव मोहोड श्री रामभाऊ मोहोड श्री खांडे आप्पा ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम चे मुख्याध्यापिका सौ महानंदा खांडे उपमुख्याध्यापक श्री.संदीप भुयार कॉर्डिनेटर कु. अनुराधा इंगोले सौ. सपना श्रीवास व शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी,पालक तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते व व वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभू्षेंत नटून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्री. महाराज व माऊलींचे फोटो पूजन तसेच पालखी पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी आपल्या आवाजात पारंपारिक गवळणी सादर केल्या. पाहुण्यांनी शाळेने महाराष्ट्राची परंपरा जिवंत राखण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र चांदूरबाजार पालखी सहित नगर प्रदक्षिणा करून विद्यार्थिनी वारकरी परंपरेचा संदेश दिला. टाळ मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात भक्तिमय उत्साह पूर्ण वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वारकरी संतपरंपरेचा व संस्कृतीचा
विद्यार्थ्यांना परिचय झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपारिक फुगड्या सादर केल्या.नगरप्रदक्षिणेनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाची आरती करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कु.अनुराधा इंगोले यांनी केले

No comments: