करंजफेण येथे वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
करंजफेण येथे वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~शाहूवाडी :करंजफेण येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे निष्ठावान नरवीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात व श्रद्धापूर्वक संपन्न झाला.यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते नामदेव पोवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित उपसरपंच प्रविण पाटील, ग्राम अधिकारी कमलाकर, सदस्य अनिल शिंदे,अध्यक्ष गणेश काशिद, मारुती संकपाळ, संजय चव्हाण,गोविंद काशिद,कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांनी त्यांच्या अद्वितीय शौर्य, स्वामिनिष्ठा आणि बलिदानाचा गौरव करत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी नरवीर शिवा काशीद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून राष्ट्रप्रेम व समाजसेवेची भावना जोपासण्याचा संकल्प करण्यात आला.

No comments: