Header Ads

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा पालकांकडून गौरव; विद्यामंदिर सावर्डे खुर्दमध्ये प्रेरणादायी सत्कार सोहळा..

 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा पालकांकडून गौरव; विद्यामंदिर सावर्डे खुर्दमध्ये प्रेरणादायी सत्कार सोहळा...

~~~~~~~~~~~~~~
सावर्डे खुर्द | प्रतिनिधी
~~~~~~~~~~~~~~

विद्यामंदिर सावर्डे खुर्द विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविणारे मार्गदर्शक शिक्षक सरदार कांबळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांचा पालकांच्या वतीने उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना शिक्षणातील गुणवत्ता आणि शिक्षकांचे योगदान अधोरेखित करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानावरून मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि शिस्त यांच्या बळावर यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले. मारुती बाळू मालवेकर यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांच्या परिश्रमांचे कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना सरदार कांबळे यांनी हा सन्मान विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचा असल्याचे सांगत भविष्यातही विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन के. डी. गोसावी यांनी केले.

यावेळी कमळकर सर, सोनाळकर सर, मोगणे सर, मांगले मॅडम, सतीश पाटील, कृष्णात पसारे, धनाजी पसारे, मारुती मालवेकर, सर्जेराव पसारे, नामदेव कांबळे, रणजित मालवेकर, उत्तम पसारे, पांडुरंग कदम, संदीप चव्हाण, सदाशिव तुरंबेकर, दिगंबर डाफळे, लक्ष्मण मिसाळ, सचिन कांबळे तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments:

Powered by Blogger.