फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्राचा अंदाज ठरणार खरा?; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याच्या उंबरठ्यावर!
फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्राचा अंदाज ठरणार खरा?; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याच्या उंबरठ्यावर!
राधानगरी :-राधानगरी धरण आता पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्राने यापूर्वी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरण्याची चिन्हे अधिक स्पष्ट होत आहेत. धरणाची पाणीपातळी ३४७.१२ फूट तर पाणीसाठा ८२८८.५९ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. बीओटीमधून १,४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, गेल्या १२ तासांत ७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरण पूर्ण क्षमतेपासून आता अवघ्या ०.३७ फूट अंतरावर आहे. त्यामुळे पाण्याची आवक आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, हीच शक्यता फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्राने काही दिवसांपूर्वी आपल्या वृत्तातून सर्वप्रथम वर्तवली होती. सध्याची धरणातील जलस्थिती आणि वाढती पाणीपातळी पाहता तो अंदाज प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, स्वयंचलित दरवाजे उघडण्याबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकरी, नदीकाठच्या गावांतील नागरिक आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. दरवाजे उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने संबंधित नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
राधानगरी धरणातील प्रत्येक घडामोड, हवामानाचा अचूक वेध, प्रशासनाचे अधिकृत निर्णय आणि सर्वात जलद, विश्वासार्ह अपडेट्ससाठी 'फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र'सोबत जोडलेले रहा. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आमचा संकल्प कायम आहे.

No comments: