बर्की धरणाच्या पिलरला गाळाचा साठा; संबंधित विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी.
बर्की धरणाच्या पिलरला गाळाचा साठा; संबंधित विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~करंजफेण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बर्की धरणाखालून मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. या दरम्यान धरणाच्या पिलरला मोठ्या प्रमाणात गाळ, झाडांच्या फांद्या तसेच वाहून आलेला लाकडी कचरा अडकून साचला आहे.
सध्या धरणाखालून पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू असला, तरी पिलरजवळ साचलेला गाळ आणि कचरा वेळेत हटविणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
स्थानिकांच्या मते, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी गाळ व कचरा वाहून येण्याची शक्यता असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. संभाव्य अडचणी टाळण्यासाठी संबंधित विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून धरण परिसराची नियमित पाहणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments: