जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोल्हापुरात विशेष पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोल्हापुरात विशेष पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर येथील हॉटेल मराठा रेजन्सी येथे रेस रिलेशन बोर्ड एसी भारत सरकार आणि बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक आदिवासी दिन व विशेष पुरस्कार सोहळा 2026” मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कार्यातून समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व, आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि सामाजिक योगदान याविषयी मार्गदर्शन केले.
या सोहळ्यामध्ये सामाजिक कार्य, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र तसेच समाजसेवेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या योगदानामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे उपस्थित वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी आदिवासी समाजातील प्रतिभावंतांना योग्य व्यासपीठ मिळणे, त्यांच्या कला-कौशल्याला प्रोत्साहन मिळणे आणि समाजाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे ही काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान आदिवासी संस्कृती व परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास आणि युवकांच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
रेस रिलेशन बोर्ड एसी भारत सरकार आणि बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सोहळ्याला अभिनेत्री अर्चना तेंडुलकर, शैलेजा दुनुग,एसी भारत सरकारचे डेप्युटी डायरेक्टर डॉ विजय सादळेकर, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर निलेश जाधव, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पुरस्कारार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सर्व नियोजन एसी भारत सरकारचे महाराष्ट्र व गोवा अध्यक्ष डॉ मॅडी तामगावकर यांनी केले होते, सूत्रसंचालन आर जे स्वप्निल पन्हाळकर यांनी केले

No comments: