Header Ads

ओतूरमध्ये रोड रोमियोवर वचक ठेवण्यासाठी निर्भया पथक सज्ज.

 ओतूरमध्ये रोड रोमियोवर वचक ठेवण्यासाठी निर्भया पथक सज्ज.

आळेफाटा (प्रतिनिधी )विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आता निर्भया पथक सक्रिय झाले आहे. शाळा, कॉलेज आणि खाजगी क्लासच्या बाहेर फिरणाऱ्या रोड रोमियोना आळा घालणे, तसेच गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी हे पथक विशेष मोहीम राबवत आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी मयुरी खोसेआणि आशिष जगताप हे ओतूर परिसरातील विविध शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत आहेत. 

या मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे, महिलांवरील अत्याचार रोखणे आणि सुरक्षिततेचे नियम समजावून सांगणे यावर भर दिला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कायद्याबद्दल आदर आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबवल्या जाणार असल्याचे यावेळी बाजगीरे यांनी सांगितले .


-

No comments:

Powered by Blogger.