Header Ads

बंजारा समाजाच्या एसटी समावेशाबाबत समितीचे पुसदच्या याडीकार पंजाब चव्हाण यांना निमंत्रण...

 बंजारा समाजाच्या एसटी समावेशाबाबत समितीचे पुसदच्या याडीकार पंजाब चव्हाण यांना निमंत्रण...

-------------------------------------------

सिद्धार्थ कदम /पुसद तालूका प्रतिनिधी✍️

------------------------------------------------

पुसद : बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गात समावेश करण्याबाबत शासनाने नियुक्त केलेल्या समितीसमोर पुराव्यानिशी मत मांडण्यासाठी पुसद येथील गोर अभ्यासक याडीकार पंजाबराव चव्हाण तसेच डॉ बबन तोलाजी पवार परभणी यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी अधिकृत निमंत्रण दिले आदेशानुसार माजी न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. एम. एल. तहलियानी यांच्या आहे. शासनाच्या उच्च


अध्यक्षतेखाली गठित समिती बंजारा प्रवर्गातील उपजमातींचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीचा अभ्यास करीत आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत समितीसमोर मत मांडण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी दु. ३.३० ते ४.१५ या वेळेत ऑनलाइन बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या जवळ उपलब्ध पुरावे व ऐतिहासिक कागदपत्रे समिती समोर सादर करण्यात येणार

असल्याचे याडीकार पंजाबराव चव्हाण यांनी सांगितले. तसेच, बंजारा समाजाच्या एसटी समावेशास पूरक ठरणारे ऐतिहासिक किंवा शासकीय पुरावे, दस्तऐवज अथवा संदर्भ ज्या नागरिकांजवळ नअसतील त्यांनी ते तातडीने ९४२१७७४३७२ या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. ही कार्यवाही बंजारा समाजाच्या एसटी मागणीसंदर्भातील महत्त्वाची प्रक्रिया मानली जात असून, आरक्षणाच्या समाजामध्ये या निमंत्रणामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.