उंचगावात गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात; २२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
उंचगावात गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात; २२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.
उंचगाव (करवीर) :- शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सत्यम फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत उंचगाव येथील कुमार व कन्या विद्यामंदिर शाळेतील हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात २२ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाणी बॉटल, वही, कंपास पेटी, पेनसह विविध शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला आधार देण्यात आला.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांवरच पुढील वाटचाल सुरू राहील."
सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे यांनीही समाजातील गरजू घटकांना सातत्याने मदत करण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशाच उपक्रमांची मालिका पुढेही राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्तात्रय फराकटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सचिन नागटिळक, प्रकाश मुदुगडे, शिवाजी लोहार, बाळासाहेब कांबळे, संदीप शेटके, अक्षय परीट, धनाजी पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंढे, नारायण बेळणेकर आणि सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
"विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे," असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

No comments: