Header Ads

कसबा तारळे - कळंकवाडी ओढ्यावरील पूल गेला तुटून.

 कसबा तारळे - कळंकवाडी ओढ्यावरील पूल गेला तुटून.


----------------------------------

कसबा तारळे प्रतिनिधी 

 पांडुरंग साबळे

----------------------------------

 कसबा तारळे ; राधानगरी तालुक्यात सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे कसबा तारळे - कंळकवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील ओढ्यावर असलेला पूल तुटून गेला आहे.रोप लावणीसह अन्य कामे सुरु असल्याने शेतकरी तुटलेल्या पुलावरून ये - जा करत आहेत. परिणामी हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.            

         याच रस्त्यावरून कळंकवाडी तसेच कळंकवाडी होऊन कसबा तारळेकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.दोन्ही गावच्या शेतकऱ्यांची शेती या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्याने ऊस वाहतुकीबरोबरच शेतीच्या कामासाठी अवजड वाहतुकही याच रस्त्यावरून होत आहे.गेल्या वर्षी या पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले होते. यावेळी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी स्वखर्चातून भराव टाकून रस्त्यावरून वाहतूक सुरळीत केली होती. पावसाळ्यानंतर भातकापणी तसेच ऊसतोड सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे.तत्पूर्वी पुलाचे बांधकाम होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. -------------------------                

No comments:

Powered by Blogger.