वारंवार गुन्हे करणाऱ्या तरुणाला १ वर्षासाठी पुणे-ठाणे जिल्ह्यातून हद्दपार ओतूर पोलिसांची धडक कारवाई.
वारंवार गुन्हे करणाऱ्या तरुणाला १ वर्षासाठी पुणे-ठाणे जिल्ह्यातून हद्दपार ओतूर पोलिसांची धडक कारवाई.
ओतूर (ता. जुन्नर )शहरातील सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या इसमावर ओतूर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ओतूर येथील साहील जीवन तांबे, वय २१ वर्षे याला १ वर्षासाठी पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश मा. उपविभागीय दंडाधिकारी, जुन्नर-आंबेगाव उपविभाग मंचर यांनी दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे याच्याविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वर्तनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये सविस्तर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर करण्यात आला होता.
त्या प्रस्तावाची सुनावणी करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी तांबे याला दि. २७ जुलै २०२७ पर्यंत 1 वर्षाच्या कालावधीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घातली असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली.
या आदेशाची अंमलबजावणी दि. १ ऑगस्ट रोजी करण्यात आली. तांबे याला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचवण्यात आले.याबाबत बोलताना ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे म्हणाले, "हद्दपारीच्या कालावधीत आदेशाचा भंग केल्यास संबंधितावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. वारंवार गुन्हे करून शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची धडक कारवाई सुरू राहील."
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे,पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदिप आमणे, पोलीस हवालदार दिनेश साबळे, अमोल शिंदे,योगेश उकीर्डे यांनी केली आहे

No comments: