काटे-भोगाव येथे आचार्य विनोबा भावे यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी.
काटे-भोगाव येथे आचार्य विनोबा भावे यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी.
--------------------कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६.
-----------------------
कळे - बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्था, काटे-भोगाव व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत आचार्य विनोबा भावे यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य विनोबाजींच्या प्रतिमेचे पूजन बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्थेच्या अध्यक्षा आनंदी कांबळे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा चे अध्यक्ष आबा कांबळे, तसेच शरद जोशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बबन खाटांगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सर्व धर्म प्रार्थना घेण्यात आली व विनोबाजींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरदार आंग्रे, गणपती पाटील, शंकर गेणू कांबळे, दामाजी वाळवेकर, रमाकांत कांबळे, सौ. मंदाकिनी कांबळे, सौ. भक्ती पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: