पुसद बस आगारामध्ये आदिवासी वाहक कर्मचारी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण!
पुसद बस आगारामध्ये आदिवासी वाहक कर्मचारी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण!
[अखेर 30 तासा नंतर चालक आरोपी,अमोल दत्तात्रेय धाडवे यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटीॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल.]
पुसद तालुका प्रतिनिधी.
~~~~±±±~~~~~~~~~~~~~~~
महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या पुसद डेपोमध्ये काम करणाऱ्या एका आंध आदिवासी महिला (आशा ब्रह्मटेके) यांना दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी गैर आदिवासी पुरुष सह कर्मचाऱ्यां कडून लोखंडी रॉड ने महिलेला मारहाण करून अन्याय झाल्याची घटना पुसद येथे घडली आहे.
परंतु जवळपास 30 तास उलटून सुद्धा पुसद येथील शहर पोलीस स्टेशन येथे
गुन्हा दाखल झाला नव्हता.फिर्याद घेताना दोन दोन वेळा बयान तरीही FIR फाडल्या जात नाही. एट्रोसिटी ऍक्ट चे कलमांचे तर नावच घेऊ नका .
अशा पद्धतीने अनुसूचित जाती, जमातीच्या महिला कर्मचारी यांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सदर बस वाहक कर्मचारी महिलेला मारहाण केल्या प्रकरणी जवळपास 30 तासानंतर महिला बस वाहक यांनी दिलेल्या तक्रारीवरून अखेर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंध कायद्यान्वये तसेच विविध कलमान्वये
*अमोल दत्तात्रय धाडवे वय 45 वर्ष बस वाहक पुसद* यांचे विरुद्ध जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये भारतीय न्याय संहिता, अर्थात BNS 2023 अन्वे 118 (1), 115 (2), 351(2) 352, तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक अधिनियम अंतर्गत 3(1) r, 3(1) (S), 3(2) ( va) इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आदिवासी महिलेला मारहाण झाल्याने सर्वच बाबतीत तत्परता असायला हवी परंतु ती या ठिकाणी बघायला मिळाली नाही अशाप्रकारे सर्व सरकारी कार्यालयात महिलांवरती असाच अन्याय अत्याचार होत राहिल्यास महिलानी कशाप्रकारे नोकरी करायची अशी खंत महिला बस वाहक आशा ब्रह्मटेके यांनी बोलताना सांगितले.
*्बॉक्स.....
पुसद बस आगारातील महिला वाहक आशा ब्रम्हटेके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाल्या होत्या परंतु दुसऱ्या दिवशी 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी आठ वाजेपर्यंत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर संभाजी सरकुंडे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी तथा राज्य माहिती आयुक्त तिथे गेले व त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून रात्री 10:30 वाजता प्रथम माहिती अहवाल एफ आय आर दाखल करून घेण्यात आला.
या निमित्ताने अनेक बाबी समोर येतात. आरोपी हे महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या राज्य परिवहन महामंडळामध्ये वाहकाच्या पदावर कार्यरत असून देखील त्यांनी कार्यालयाचे परिसरात सार्वजनिक जागेवर स्त्री असलेल्या सह वाहकाला प्राणघातक मारहाण केली. परिणामी भारतीय संविधानाने तिला कलम 21 नुसार बहाल असलेला जीवन जगण्याचा मूलभूत हक्क धोक्यात आणला.
संभाजी सरकुंडे.
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, तथा माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य

No comments: