निधन वार्ता.
निधन वार्ता.
देवाळे (ता. पन्हाळा) येथील पांडुरंग बाबुराव कुंभार (वय ८२) यांचे आकस्मिक निधन
पन्हाळा प्रतिनिधी | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
देवाळे (ता. पन्हाळा) येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग बाबुराव कुंभार (वय ८२) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने देवाळे व परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता पंचगंगा स्मशानभूमी, कोल्हापूर येथे होणार आहे.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र परिवारातर्फे दिवंगत पांडुरंग बाबुराव कुंभार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

No comments: