मरळी येथे आधारशिला व नवचेतना वेलकम मेळावा उत्साहात.
मरळी येथे आधारशिला व नवचेतना वेलकम मेळावा उत्साहात.
------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
------------------------------
कळे:- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पन्हाळा, बीट कळे अंतर्गत मरळी (ता. पन्हाळा) येथील विद्यामंदिर मरळी येथे आधारशिला व नवचेतना वेलकम मेळावा उत्साहात पार पडला.
अंगणवाडी ही मुलांच्या आयुष्यातील शिक्षणाची पहिली पायरी असते. या मेळाव्यात सुरुवातीला अंगणवाडीतील मुलांना फुगे देऊन वाजत-गाजत शाळेत आणण्यात आले.
त्यानंतर मरळी ग्रामपंचायत सरपंच सौ. कमल चौगले व मुख्याध्यापक अस्वले सर यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर अंगणवाडीत राबवले जाणारे विविध उपक्रम जसे शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भाषा विकास, सामाजिक विकास, सृजन कौशल्य यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच आहार प्रदर्शनही घेण्यात आले.
या मेळाव्यास आयसीडीएसचे सहाय्यक सीडीपीओ प्रतिभा शिर्के, सुपरवायझर तेजस्विनी टिपुगडे मॅडम, जाधव मॅडम, अध्यापिका सौ. अस्वले मॅडम, अंगणवाडी सेविका भारती तळसकर, मनिषा रोहिले, सविता पोवार, शारदा लोहार, अनिता कांबळे, भाग्यश्री पोवार व कळे-१ मधील सर्व सेविका उपस्थित होत्या.

No comments: