Header Ads

धडाकेबाज! अमरावती पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदाच ‘अँटी गुंडा स्कॉड’ची एंट्री; एका आठवड्यात ५ तडीपार, २ हिस्ट्रीशीटर जेरबंद डाकेबाज!

 धडाकेबाज! अमरावती पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदाच ‘अँटी गुंडा स्कॉड’ची एंट्री; एका आठवड्यात ५ तडीपार, २ हिस्ट्रीशीटर जेरबंद डाकेबाज! अमरावती पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदाच ‘अँटी गुंडा स्कॉड’ची एंट्री; एका आठवड्यात ५ तडीपार, २ हिस्ट्रीशीटर जेरबंद

डीसीपी यशवंत सोळंके यांची धडक मोहीम; गुन्हेगारांवर आता ‘अँटी गुंडा स्कॉड’चा करडा पहारा.


अमरावती | प्रतिनिधी : पी. एन. देशमुख


अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदाच ‘अँटी गुंडा स्कॉड’ स्थापन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या नेतृत्वात हे विशेष पथक कार्यरत झाले असून, सुरुवातीलाच धडाकेबाज कारवाई करून गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवली आहे.

परिमंडळ-१ अंतर्गत येणाऱ्या गाडगे नगर, फ्रेजरपुरा, नागपुरी गेट, नांदगाव पेठ, बडनेरा आणि वलगाव या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे पथक विशेष मोहीम राबवत आहे. फरार, तडीपार, हिस्ट्रीशीटर आणि शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे.

एका आठवड्यात मोठी कारवाई

१२ ते १८ सप्टेंबरदरम्यान अँटी गुंडा स्कॉडने शहरभर धडक मोहीम राबवत:

५ तडीपार आरोपींना ताब्यात घेतले.

शस्त्र कायद्यांतर्गत २ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांना अटक केली.

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांची मोठी जरब निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

डीसीपी यशवंत सोळंके यांचा इशारा

पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले की, अमरावती शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. अँटी गुंडा स्कॉडच्या माध्यमातून गुन्हेगारांवर सातत्याने नजर ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

पथकाचे नेतृत्व PSI मिलिंद हिवरे यांच्याकडे

या विशेष पथकाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांच्या पथकात सुभाष पाटील, सतीश फराळे, मतीन शेख, सतीश देशमुख आणि चंद्रकांत जनबंधू यांचा समावेश असून, शहरातील गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी हे पथक सातत्याने सक्रिय राहणार आहे.

No comments:

Powered by Blogger.