अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त एस टी महामंडळ मार्फत मध्यवर्ती बस स्थानकावरून पहाटे पाच वाजल्यापासून ज्यादा बसेस
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त एस टी महामंडळ मार्फत मध्यवर्ती बस स्थानकावरून पहाटे पाच वाजल्यापासून ज्यादा बसेस .दयानंद पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
एस टी महामंडळ मार्फत दिनांक 30 सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मध्यवर्ती बस स्थानकावरून पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी नऊ पर्यंत प्रत्येक पंधरा मिनिटाला जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी दिली
30 सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी असल्याने गणपतपुळे येथे मध्यवर्ती बस स्थानकावरून पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी नऊ पर्यंत जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 50% सवलत व अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे गणपतपुळे अंगारकी संकष्टी साठी 50 सीटची एसटी बुक केली त्यांच्यासाठी बसेस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी गणेश भक्त याचा लाभ घ्यावा व एसटी प्रवास सुख व आनंदित करावा असे आव्हान छत्रपती संभाजी आगार व्यवस्थापक दयानंद पाटील व यांनी केले आहे

No comments: