श्री क्षेत्र गणपतीपुळेचा देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू.दर्शन खोत यांच्या कलाकृतीला गणेशभक्तांची दाद.
श्री क्षेत्र गणपतीपुळेचा देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू.दर्शन खोत यांच्या कलाकृतीला गणेशभक्तांची दाद.
--------------------------
रेंदाळ प्रतिनिधी
सचिन कुंभार
9021281100
--------------------------
रेंदाळ : गणेशोत्सवाच्या उत्साहात बिरदेव नगर येथे दर्शन खोत यांनी आपल्या कल्पकतेला कलात्मकतेची जोड देत श्री क्षेत्र गणपतीपुळेचा भव्य आणि आकर्षक देखावा साकारला आहे. गणपतीपुळेच्या मंदिरासह समुद्रकिनारा, डोंगररांगा आणि निसर्गरम्य परिसराची हुबेहूब प्रतिकृती साकारत त्यांनी कोकणातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा अनुभव स्थानिक पातळीवरच उभा केला आहे.
देखाव्यातील बारकावे, सुबक रचना आणि आकर्षक प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण परिसराला देखणे रूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, गणपतीपुळेच्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि सभोवतालचा निसर्ग टिपण्याचा प्रयत्न दर्शन खोत यांनी अत्यंत कल्पकतेने केला आहे. त्यामुळे हा देखावा पाहताना भाविकांना प्रत्यक्ष गणपतीपुळे येथे आल्याची अनुभूती मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या देखाव्याने बिरदेव नगरातील गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी रंग भरला असून, नागरिक व गणेशभक्तांकडून दर्शन खोत यांच्या कलाकृतीचे कौतुक होत आहे. पारंपरिक भक्तीला सर्जनशीलतेची जोड देणारा हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे.

No comments: