इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी मुले व मुली स्पर्धा उत्साहात संपन्न
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी मुले व मुली स्पर्धा उत्साहात संपन्न.
------------------------------------इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन तलवारबाजी मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सन्माननीय सचिव श्री. विरसिंह रणसिंग (भैय्या), विश्वस्त श्री. शंकरराव रणसिंग (नाना), पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती सचिव डॉ. अमय काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट, डॉ. अप्पासाहेब चव्हाण, डॉ. अतुल गोरे, डॉ. ज्ञानेश्वर चिमटे, डॉ. मिलिंद थोरात, श्री. अभिषेक दुधाणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत निमसाखर या ठिकाणी संपन्न झाला.
स्पर्धेमध्ये विभागातील 14 महाविद्यालयातील 47 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
पुरुष गटामध्ये चांदमल ताराचंद महाविद्यालय शिरूर यांनी प्रथम, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांनी द्वितीय तर मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय लोहगाव यांनी तृतीय क्रमांक संपादित केला.
महिला गटामध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांनी प्रथम, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांनी द्वितीय, तर आर्मी लॉ महाविद्यालय आणि इंदिरा अभियांत्रिकी महाविद्यालय परंदवाडी यांनी संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सर्व विजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रके आणि मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विजेत्या खेळाडूंची अहिल्यानगर येथे संपन्न होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
स्पर्धा यशस्वी होण्याकरिता इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

No comments: