Header Ads

अखिलभारतीय ब्राह्मण महासंघातर्फे जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरे.

 अखिलभारतीय ब्राह्मण महासंघातर्फे जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरे.



--------------------------

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शाखा कोल्हापूर मधील जेष्ठ नागरिक आघाडीचे वतीने माहे सप्टेंबर २६मध्ये असलेल्या ज्येष्ठ सभासदांच्या वाढदिवसाचे सत्कार व अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.२७सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रारंभी श्री परशुराम प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जोशी , अध्यक्ष चिंतामणी जोशी,कार्याध्यक्ष अभय नेर्लेकर, विनायक कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.ब्राम्हण महासंघाचे वतीने जेष्ठाचे वाढदिवस साजरे करण्याचा मूळ हेतू ,कार्याध्यक्ष श्री.अभय नेर्लेकर यांनी विषद केला तर विनायक कुलकर्णी यांचे "जेष्ठांचे आनंदी जीवन"यावर मौलीक व्याख्यान झाले. पैशाबरोबर जेष्ठ व्यक्तीचाअनुभवांचा  समाजाला,दुर्बल घटकांना आपण कशाप्रकारे फायदा  करुन देवू शकतो व त्याचा आनंद स्वतः:घेत  दुसऱ्या लादेखील त्या आनंदात सामावून घेवू शकतो.असे स्वानुभव सांगुन श्री.कुलकर्णी यांनी सांगीतले.सप्टेंबर २६मधील आठ जणांपैकी उपस्थीत स्मीता कुलकर्णी, नितीन नांद्रेकर गुरूजी, चिंतामणी जोशी या तिघांचे त्यांचे   वाढदिवसा निमीत्त‌ राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री शाम जोशी ,अभय नेर्लेकर यांचे हस्ते नँपकीन बुके देवून सत्कार  करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर विनायक कुलकर्णी, चिंतामणी जोशी उपस्थीत होते.

 या कार्यक्रमास श्री राघवेंद्र स्वामी मठाचे के.रामाराव,संजीव कुलकर्णी,शेतकरी आघाडीचे श्री. आमते आदींची उपस्थिती होती." सामाजिक स्तरावरील अशा कार्यक्रमामुळे आम्हाला आनंद तर होतोच पण या उतार वयातसुध्दा नवीन काही करण्याची उर्मी व बळ मिळत असल्याचे" सत्कारमूर्ती  सौ.स्मीता कुलकर्णी यांनी  सत्काराला उत्तर देताना सांगीतले. राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.जोशी यांनी सर्वांना वाढदिव साच्या शुभेच्छा दिल्या.उपस्थीत जेष्ठापैकी श्री.गोडखिंडीकर यांनी "या जन्मावर"हे गाणे सादर केले.श्री.चिंतामणी जोशी यांनी आभार मानले. शेवटी चहापान होवून कार्यक्रमाची सांगता झाली.अत्यंत खेळीमेळीत व आनंदात महासंघातर्फे साजरे होत असलेले वाढदिवस हे जेष्ठांचे जगण्याचे टाँनिक आहे,अशी भावना उपस्थितीत सभासदांनी व्यक्त झाली.

--------------------------

No comments:

Powered by Blogger.