Header Ads

मलकापूर नगरपरिषदेला अखेर मैला सक्शन वाहन प्राप्त.

 मलकापूर नगरपरिषदेला अखेर मैला सक्शन वाहन प्राप्त.

-----------------------------

मलकापूर प्रतिनिधी 

रोहित पास्ते 

-----------------------------

  केंद्र पुरस्कृत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर स्वच्छता कृती आराखड्यानुसार मलकापूर नगरपरिषदेला ३ हजार लिटर क्षमतेचे मैला सक्शन वाहन दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त झाले.


सुमारे चार वर्षांपासून प्रलंबित असलेले हे वाहन नगराध्यक्षा सौ. रश्मी शंतनू कोठावळे, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाले आहे.


या वाहनाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरगुती मैला टाक्या व सेप्टिक टँक उपसा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासन तसेच मुख्याधिकारी सौ. अंगाई जयसिंगराव साळुंखे यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.