Header Ads

शिवन्याची अभिनयात उत्तुंग भरारी!

 शिवन्याची अभिनयात उत्तुंग भरारी!


इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे .

-------------------------------------

इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर संस्थेच्या खजिनदार वीरबाला धैर्यशील पाटील यांची कन्या शिवन्या पाटील हिने शिक्षणासोबतच अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रात बालकलाकार म्हणून पदार्पण करीत अल्पावधीतच आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध नामांकित ब्रँडच्या जाहिराती तसेच चित्रपटांमध्ये काम करीत तिने अभिनयकौशल्य सिद्ध केले असून तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


शिवन्या पुण्यातील पवार पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असून वयाच्या पाचव्या वर्षापासून काटेकोर वेळापत्रकानुसार अभिनय, नृत्य आणि अभ्यास यांचा समतोल साधत आहे. ‘बाप माझा लय भारी’ या चित्रपटात तिने काम केले असून आगामी दोन मराठी चित्रपटांसाठीही तिची निवड झाली आहे. ‘नाईके’सह ममाज अर्थ, इन्स्टामार्ट, गणेश भेळ, बुधानी वेफर्स, पॉपसोल्स आणि किंडर जॉय यांसारख्या नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्येही तिने काम केले आहे. तीन मराठी गाण्यांच्या अल्बममध्ये तसेच नामांकित सेलिब्रिटींसोबत जाहिरातींमध्येही तिचा सहभाग आहे.


चित्रिकरणाच्या व्यस्त वेळापत्रकातही शिवन्याने अभ्यासात अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तिचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. शाळेनंतर पाच ते सात ट्युशन आणि त्यानंतर डान्सचा सराव व अभ्यास असा तिचा दिनक्रम आहे. व्यावसायिक अभिनय प्रशिक्षणाशिवाय ती घरच्या घरी संवादफेक, भावाभिव्यक्ती आणि कॅमेऱ्यासमोरील सादरीकरणाचा नियमित सराव करते.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा इंदापूर पंचायत समितीचे सभापती स्वर्गीय विश्वासराव रणसिंग दादांनी सन १९८० मध्ये ग्रामीण भागातील मुलीनी शिक्षण,कला, क्रीडा,अभिनय यामध्ये सहभाग घेतला पाहिजे या हेतूने शैक्षणिक संकुल उभारले.दादांनी शिक्षणासोबत,सहकार,कृषी क्षेत्रात समाजकारण केले.अभिनय क्षेत्रात मुली चमकल्या पाहिजेत अशी त्यांची इच्छा होती.शिक्षणासोबतच त्यांनी ग्रामीण भागातील मुलींनी सर्व क्षेत्रांत पुढे यावे,अशी भूमिका घेतली होती.त्यांची नात अभिनय क्षेत्रात कलाकार म्हणून नावारूपाला येत आहे. शिवन्याचे वडील धैर्यशील पाटील व्यवसायिक असून आई वीरबाला पाटील गृहिणी तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.मुलीला अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यास त्यांनी पाठिंबा दिला आहे.

वीरबाला पाटील  यांनी सांगितले, कि माझ्या वडिलांची इच्छा होती की मुलीनी शिक्षण,कला, क्रीडा,अभिनय क्षेत्रात करिअर करावे हेच वडिलांचे स्वप्न नात पूर्ण करीत आहे.त्यांचे हे स्वप्न नात शिवन्याच्या रूपाने साकार होत असल्याचे समाधान व्यक्त केले. 

संस्थेच्या अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग, विश्वस्त कुलदीप  हेगडे आणि विश्वस्त राही रणसिंग यांनी शिवन्याचे कौतुक केले.तिच्या जिद्दीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण आणि कलाक्षेत्राची नवी प्रेरणादायी वाट निर्माण झाली आहे.


फोटो  ओळ  - बाल कलाकार शिवन्या पाटील

No comments:

Powered by Blogger.