तृप्ती राजेंद्र देशमुख (काळे) यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून आचार्य पदवी (Ph.D.) प्रदान
तृप्ती राजेंद्र देशमुख (काळे) यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून आचार्य पदवी (Ph.D.) प्रदान
अमरावती:- शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथील सौ. तृप्ती राजेंद्र देशमुख (काळे) यांना नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून गृह-अर्थशास्त्र शाख्याची 'आचार्य पदवी' (Ph.D.) प्राप्त झाली आहे.
त्यांचा संशोधनाचा विषय "अमरावती शहरातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण" हा होता. या संशोधनाकरिता त्यांना पर्यवेक्षक डॉ. सौ. अंजली पांडे (चेपे) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेटे, पी.एच.डी. सेल समन्वयक डॉ. किशोर साबळे, गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्वाती वैद्य, डॉ. गिरी, डॉ. घोडेस्वार तसेच सौ. मालधुरे, श्रीमती माया देशमुख, राजश्री काळे, श्री. संजय इंगोले, अनुराग काळे, परीक्षित देशमुख आणि श्री. सुरेंद्र काळे यांना दिले आहे.
सौ. तृप्ती देशमुख यांच्या या विशेष यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

No comments: