कळे धरण परिसरात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम उत्साहात; कचरा, प्लास्टिक हटवून बापूंना अभिवादन
कळे धरण परिसरात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम उत्साहात; कचरा, प्लास्टिक हटवून बापूंना अभिवादन.
--------------------------------------कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
------------------------
कळे :- २ ऑक्टोबर २०२६ महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज पहाटे ५ ते ७ या वेळेत कळे धरण परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
*कळे विद्या मंदिर कळे माजी विद्यार्थी संघटना प्रणीत व गुरुवर्य आर. व्ही. अष्टेकर सर प्रेरित श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मरळी* यांच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
धरणाच्या व पुलाच्या शेजारी साचलेला कचरा, प्लास्टिक, कपडे, प्लास्टिक कप एकत्र करून सुरक्षित ठिकाणी नेऊन नष्ट करण्यात आले. तसेच पुलाच्या अँगलला अडकलेल्या व बांधलेल्या प्लास्टिक पिशव्या काढून त्या देखील नष्ट करण्यात आल्या. मोहिमेनंतर संपूर्ण धरण परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला.
या स्वच्छता मोहिमेत अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला -
चोबेल पुरस्कार प्राप्त संस्था सदस्य, वाघुर्डे गावचे सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक मा. सुरेश नाईक, संस्था सदस्य व राज्य पुरस्कार सन्मानित राजर्षी शाहू मित्र मंडळाचे कार्यकर्ते, महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचा 'स्वच्छता दूत' पुरस्कार प्राप्त मा. शरद दंताळ (कळे), सचिव मा. संभाजी दांगट (मरळी)* यांच्यासह मॉर्निंग वॉकला आलेले ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व तरुण मुलांनी मोठ्या उत्साहात हातभार लावला.
"स्वच्छता हीच खरी सेवा" हा महात्मा गांधीजींचा संदेश कृतीतून दाखवत उपस्थितांनी गांधी जयंती साजरी करून महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन केले.

No comments: