मुख्याध्यापक अनिल वीर यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
*मुख्याध्यापक अनिल वीर यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
रेंदाळ : कन्या विद्या मंदिर, रेंदाळ येथील कार्यकुशल मुख्याध्यापक मान. श्री. अनिल अनंतराव वीर यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला गौरवपूर्ण निरोप देत त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी शैक्षणिक सेवेतून निवृत्त झालेल्या अनिल वीर सरांच्या सन्मानार्थ शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी हुपरी येथील राज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी तसेच शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उपस्थितांनी आवर्जून उल्लेख केला. कार्यतत्परता, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी यामुळे वीर सरांनी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, पत्रकार,ग्रामपंचायत रेंदाळचे पदाधिकारी व सदस्य, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अनिल वीर सरांचा सत्कार करून त्यांच्या पुढील आनंदी व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.दीर्घ शैक्षणिक सेवेला मानाचा मुजरा करत उत्साही वातावरणात हा सत्कार सोहळा संपन्न झाला.

No comments: