महावितरणच्या सातत्याने वीज खंडित करण्याच्या भूमिकेला ग्रामस्थ कंटाळले; सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी
महावितरणच्या सातत्याने वीज खंडित करण्याच्या भूमिकेला ग्रामस्थ कंटाळले; सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी
परळी : प्रतिनिधी – अमर इंदलकर
सातारा - परळी गावात वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. दिवसभरातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती कामांसह शेतीपंप, लघुउद्योग आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याबाबत महावितरणकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
महावितरणने वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे स्पष्ट करून तातडीने आवश्यक दुरुस्ती व देखभाल करावी आणि परळी गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. समस्या कायम राहिल्यास ग्रामस्थांकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे सामूहिक निवेदन देऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही दिला जात आहे.

No comments: