डी सी नरके कॉलेजमध्ये झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात संपन्न.
डी सी नरके कॉलेजमध्ये झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात संपन्न.
कुडित्रे- ता. करवीर येथील डी.सी. नरके ज्युनिअर कॉलेजमध्ये झिम्मा-फुगडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश- गौरी पूजनाने कॉलेजचे प्राचार्य डी एस चौगले सर, सौ अंजना गोरक्ष फाळके सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) कोल्हापूर, सौ सरीता महादेव लायकर पोलिस निरीक्षक (PI) कोल्हापूर, पोलिस हवलदार जी एस नलवडे तसेच सर्व विद्यार्थींनी , शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शुभहस्ते गौरी-गणेशाचे पूजन व मंगलारतीने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डी एस चौगले सर होते. पाहुण्यांची ओळख प्रा. सुमन पाटील मॅडम यांनी.
करुन दिली. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या म्हणून सौ अंजना फाळके मॅडम (API)व सरीता लायकर मॅडम (PI) यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत कायदा व सुव्यवस्थेबरोबरच आत्मविश्वास,स्वावलंबन आणि स्वतःच्या संरक्षणाबरोबरच जिद्द, चिकाटीच्या बळावर योग्य वयात यशाला गवसणी घालून आईवडील व शाळा कॉलेजचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले.
झिम्मा-फुगडी स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थीनींनी पारंपरिक मराठी वेशभूषा करून उत्स्पूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थींनीनी केवळ झिम्मा-फुगडीच नव्हे तर घागर घुमवणे, काटवट कणा, सूप नाचवणे यासारखे लुप्त पावलेले पारंपारिक खेळ खेळून संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला. तसेच विविध आकर्षक गौरी गीतेही सादर केली.
या कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जे डी लव्हटे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कु.सुजाता शिंदे मॅडम यानी केले .

No comments: