Header Ads

हरवलेल्या दीड वर्षाच्या बालकाचा एमआयडीसी कुपवाड पोलिसांकडून तात्काळ शोध घेऊन सुखरूप पालकांच्या ताब्यात सुपूर्द.

 हरवलेल्या दीड वर्षाच्या बालकाचा एमआयडीसी कुपवाड पोलिसांकडून तात्काळ शोध घेऊन सुखरूप पालकांच्या ताब्यात सुपूर्द.

---------------------------------
सांगली मिरज प्रतिनिधी 

राजू कदम 

---------------------------------

कुपवाड : एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील उदगीर भारत सद्गिरण परिसरात अर्णव सुशांत हिंगमिरे, वय दीड वर्षे, रा. सुयोगनगर हा लहान मुलगा हरवलेला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले.


सदर मुलास स्थानिक नागरिकांनी विचारपूस केली असता, त्यास स्वतःबाबत कोणतीही माहिती सांगता येत नसल्याने नागरिकांनी त्यास सुरक्षितपणे एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.


सदर घटनेची पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तात्काळ दखल घेतली. पोलिसांनी बालकाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तत्काळ कार्यवाही करून त्याची आई सुहासिनी सुशांत हिंगमिरे यांचा शोध घेतला.


त्यानंतर बालकाची ओळख पटवून आवश्यक खातरजमा करण्यात आली व अर्णव हिंगमिरे यास सुखरूपपणे त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.


हरवलेल्या बालकाबाबत तात्काळ प्रतिसाद देऊन त्याचा शोध घेऊन सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याने पालकांनी एमआयडीसी कुपवाड पोलिसांचे आभार व्यक्त केले.


एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे, सांगली

No comments:

Powered by Blogger.