Header Ads

दिल्लीतील जंतर-मंतरवर ऊसदरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; माध्यमांनी दखल घेण्याचे आवाहन.

 दिल्लीतील जंतर-मंतरवर ऊसदरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; माध्यमांनी दखल घेण्याचे आवाहन.


------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

------------------------------

दिल्ली : ऊसदराच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी स्वतःच्या खर्चाने दिल्ली गाठून विविध मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये साखरेला ५० ते ६० रुपये किलो दर, इथेनॉलला ७० ते ८० रुपये दर आणि उसाला प्रतिटन ५ ते ६ हजार रुपये पहिली उचल देण्याचा समावेश आहे.

या आंदोलनाची दखल घेऊन टीव्ही, प्रिंट, डिजिटल व यूट्यूब माध्यमांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेशदादा शेवाळे यांनी केले आहे. आंदोलनाची माहिती व छायाचित्रे माध्यमांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Powered by Blogger.